About us
विठ्ठला, पांडुरंगा, हरी!!
विठ्ठला, पांडुरंगा, हरी!!
Mi Marathi is a non-profit group which was initially founded to embrace and promote the rich heritage of Maharashtrian culture. However, with overwhelming love and participation from various communities across Newcastle, our group has grown into a vibrant platform that now celebrates the diverse cultures, traditions, and unity of our incredible nation.
Our aim to bring preserve the Maharashtrian culture with the Indian origin generation and give the Indian cultural feel to the people who are living away from home.
Our Vision
Mi Marathi is a non-profit group which celebrates cultural program for the Maharashtrian and Indian community in Newcastle area.
Mi Marathi group always committed to bring preserve the Maharashtrian culture with the Indian origin generation and give the Indian cultural feel to the people who are living away from home.
Read message from founder
Founder – Sujata Sawant
माझं नाव सुजाता सावंत. मी ठाणे कोर्टात सुमारे १४ वर्षे सिव्हिल प्रॅक्टिस करणारी वकील म्हणून कार्यरत होते. २०१७ मध्ये मी न्यूकॅसल, यूके येथे आले आणि दोन वर्षांनी कोविडचा काळ सुरू झाला. त्या काळात आलेलं एकटेपण मला माझ्या मराठी समुदायाची आणि संस्कृतीची प्रकर्षाने आठवण करून देत होतं. तेव्हा जाणवलं की आपली मराठी संस्कृती किती समृद्ध आहे आणि आपले सण-उत्सव साजरे केल्याने मनावर किती सकारात्मक परिणाम होतो. भारतात असताना ही जाणीव इतकी तीव्र नव्हती; पण परदेशात राहून तिचं खरं महत्त्व उमगलं.
याच जाणिवेतून विचार आला — आपल्याला आनंद देणारे आणि आपलेपणाची भावना जागवणारे मराठी कार्यक्रम इथेही आयोजित करावेत. मग सुरुवात झाली मराठी कुटुंबांचा शोध घेण्याची. व्हॉट्सअॅपमुळे संपर्क साधता आला आणि जन्म झाला “मी मराठी” समूहाचा.
पहिला कार्यक्रम होता हळदीकुंकू. महिलांनी इतक्या उत्साहाने सहभाग घेतला की सुंदर मैत्रीबंध तयार झाले. पुढे गप्पांमध्ये सतत मराठी पदार्थांची आठवण निघू लागली — पुरणपोळी, मोदक, अळूवडी… आणि तेथून सुचली कल्पना महाराष्ट्रीयन फूड फेस्टिव्हलची. १५० क्षमतेच्या हॉलमध्ये ३५०–४०० लोक उपस्थित होते आणि एका तासात सर्व पदार्थ संपले! लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पुढे काम करण्याचा उत्साह अधिक वाढला.
माझ्या मनात नेहमी खंत यायची की आपल्या मुलांना शिवजयंतीचा खरा अनुभव मिळत नाही. म्हणून आम्ही ढोल-ताशा आणि लेझीमसह शिवजयंती साजरी केली आणि त्याच निमित्ताने ढोल-ताशा-लेझीम पथकाची स्थापना केली. आज या पथकात जवळपास २०–२५ सदस्य आहेत आणि हे पथक गणपती उत्सव, १५ ऑगस्ट तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या मराठी संस्कृतीची ओळख अभिमानाने सादर करतं.
त्यानंतर आषाढी एकादशीही साजरी केली. त्या दिवशी सर्वजण विठ्ठलाच्या अभंग-भजनात तल्लीन झालेले पाहून मन भरून आलं.
अशा प्रकारे मी मराठी चा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता १०० पेक्षा जास्त मराठी कुटुंबं एकत्र आली. पुढचं पाऊल म्हणून “मी मराठी” वेबपेजची सुरुवात केली. जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आहे; पण एकच ध्येय आहे — प्रत्येक कार्यक्रमातून सर्वांना आपलेपणाचा आणि मायभूमीचा अनुभव मिळावा, आणि परदेशात राहूनही आपण आपल्या मुलांसोबत अभिमानाने मराठी संस्कृती साजरी करतोय याचं समाधान लाभावं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
